टॉप बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२८ जुलै) : गेल्या वर्षभरापासुन कोराना या महा भयंकर रोगाने संपूर्ण भारतात थैमाण घातले त्यामुळे अनेकांना रूग्नवाहीका, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर तसेच इतर उपचाराचे साहित्य सामुग्री व योग्य उपचार न मिळाल्याने नाहक अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

कित्येकवेळा गोरगरीबांना रूग्णालयात जाण्यासाठी रूग्णवाहीका न मिळाल्याने आपला जीव सोडावा लागला ती अत्यंत गंभीर परिस्थीती होती. या गोष्टीचा विचार करून माजी महापौर विमलताई बी राजपूत व किशोर राजपूत यांनी वार्ड क्र 62 संभाजी काॅलनी सिडको एन सहा मध्ये मोफत रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला त्या अनुषंगाने दि. २७ जुलै २०२१ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा अर्पण करून वार्डातील तसेच शहरातील गोरगरीबांना मोफत रूग्णवाहीकेमार्फत चोवीस तास सेवा करण्यासाठी रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली.

म्हणुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सचिन दाडगे, मयुर जमधडे, सचिन गायकवाड, अभिजीत गावडे, शेखर बिडला, निखिल गवळी, क्षितीज काबळे, अनिकेत श्रीवास्तव, उमाकांत वैद्य, पप्पु गवई, महेन्द्र कुलकर्णी, उपस्थित होते.
Previous Post Next Post