"काळ्या फिती" बांधुन जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद विदर्भ शाखेचे निवेदन


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
भंडारा, (२४ जुलै) : दि २३जुलै रोजी अमरावती लोकसभेतील खासदार श्रीमती नवनीतजी राणा यांनी महामहिम राष्ट्रपती श्री. मा. रामनाथ कोविंदजी यांना उद्देशुन लिहीलेल्या पञाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील नामसदॄश्य बोगसांनी जात चोरी करून नामसदॄश्याचा फायदा घेणे सुरु होता, त्यावर प्रतिबंध बसल्यानंतर ह्यात परिस्थीतीत १८/१२/२० रोजीच्या सुप्रिम न्यायालयाचे निर्णयाने जात चोरांना अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समितीकडून वैधता प्रमाणपञ मिळत नाहीत. ही बाब समोर करून जात चोरी करणाऱ्यांना त्यासंबंधीत नामसदॄश्याने जात चोरांचे बंद असलेले कायमचे दरवाजे उघडे करण्यास त्या बोगसांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाचे सन २००० मध्ये दिलेल्या आदेशा नुसार महाराष्ट्र अनुसुचित जमाती पडताळणी समित्या स्थापण करण्यात आलेल्या आहेत. ही दगडावरची काळी रेघ प्रकाशा ईतपत सत्य पुढे असतांनी समित्यांना आवाहन देत आपल्या पदाचा असंवैधानिक पणे उपयोग करित त्या रद्द करण्याबाबत व त्यांची संवेधानिकता तपासण्यात यावी. अशा प्रकारचे खोडसरवॄती व बेजबाबदारपणाचे दबावतंञा चे निवेदन जातचोर व बोगसांचे समर्थनात दिल्यामुळे राज्यातील ट्राईबल समुदयामध्ये अमरावती खासदार नवनीत राणा यांच्या विरुध्द तिव्र निषेध व अंसंतोषाची भावना  पसरलेली आहे. हेच सत्य शासन दरबारी नोंदविण्यासाठी "काळ्या फिती" लावून काल दि.२३/७/२१ ला नागपूर माननिय जिल्हाधिकारी यांना गोंडवाना युवा मोर्चा व अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद विदर्भाच्या नेतॄत्वात निवेदन देण्यात आले. खऱ्या आदिवासी जमातीच्या संपुर्ण संतप्त प्रतिक्रियेनंतर खासदार श्रीमती नवनित जी राणा यांनी दिली. याबाबत ची प्रतिक्रिया पञकार परिषद घेवून खऱ्या आदिवासी समुदयांना अवगत करावी अन्यथा येणाऱ्या काही काळात पुतळा दहन करून तीव्र निषेध नोंदविण्यात येईल असा सज्जड इशारा विदर्भ युवा परिषदेचे महासचिव विनोद वट्टी यांनी दिला आहे. या प्रसंगी जिल्हा गोंडवाना फ्रंट युवा उपाध्यक्ष सौरभ मसराम मिलिंद कोवे, सदस्य ग्राम पं.कार्तिक कन्हाके, अर्शद गेडाम अजर माथरे आदि पदाधिकारी उपस्थित होते .

  

"काळ्या फिती" बांधुन जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद विदर्भ शाखेचे निवेदन "काळ्या फिती" बांधुन जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद विदर्भ शाखेचे निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.