सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२८ जुलै) : तालुक्यातील वल्हासा पोड येथील रहिवासी असलेल्या व जुनोनी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या पंचवीस वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन या गंभीर प्रकाराबाबत जाणून घेतले असता मुलीने जुनोना येथीलच एका युवकाने ओळख निर्माण करून अनेकदा जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. तसेच शारीरिक संबंधाबद्दल आई वडिलांना सांगितल्यास तुला व तुझ्या आईवडिलांना जीवानिशी ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले. मुलीची आपबिती ऐकल्यानंतर मुलीच्या आईने २६ जुलैला रात्री ८.२३ वाजता मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार मुकुटबन पोलिस स्टेशनला नोंदविली. झरी तालुक्यातील वल्हासा पोड येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी जुनोनी येथील आश्रम शाळेत ९ व्या वर्गात शिकत होती. शाळेला सुटी असली की, ती जुनोना गावातील दुकानात आवश्यक वस्तू खरेदीकरिता जायची. अशातच गावातील एका युवकाने तिच्याशी ओळख निर्माण केली. ओळख वाढतच गेली, व तो तिच्याशी जवळीक साधण्याची संधी शोधू लागला. मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी तो वल्हासा पोड येथे आला, व मुलीला भेटला. दरम्यान मुलगी शौचास गेली असता सदर युवक तिच्या मागे गेला, व जबरदस्ती त्याने मुलीला तिच्या आजोबाच्या वावरात नेत तिच्याशी बळजबरी केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये तिच्या आजोबाच्याच वावरात परत तिच्यावर त्याने बळजबरी केली. नंतर नेहमी तो तिला भेटायला बोलावून तिच्याशी बळजबरी करू लागला. वारंवार तिचे शारीरिक शोषण करण्यात आल्याने तिला गर्भधारणा झाली. अचानक तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने तिला वणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकताच मुलीची आई चांगलीच हादरली. आईने मुलीला विश्वासात घेऊन या गंभीर प्रकाराबाबत जाणून घेतले असता तिने आपल्यावरील आपबिती कथन केली. मुलीच्या आईने जुनोना येथे जाऊन मुलीवर बळजबरी करणाऱ्या युवकाला तिच्याशी केलेल्या अपकृत्याबाबत जाब विचारला असता त्याने मुलीच्या आईला पोलिसांत तक्रार केल्यास सरळ जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या आईने मुकुटबन पोलिस गाठून मुलीवर झालेल्या अत्याचाराची रीतसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपी विलास तुकाराम आत्राम (२५) रा. जुनोनी ता. झरी याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ३७६ (A)(१), ५०६ व RW ४,८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पीएसआय राठोड करीत आहे.
वारंवार होणाऱ्या बळजबरीमुळे अल्पवयीन मुलीला झाली गर्भधारणा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2021
Rating:
