विहरीत पडलेल्या माकडाला वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेने दिले जीवनदान

सह्याद्री न्यूज | रूस्त्तम शेख
कळंब, (२० जुलै) : मांजरवाळी येथील शेतातील विहरीत दोन दिवसांपासून माकड पडून होते विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे माकडास बाहेर येणे शक्य नव्हते सदर घटनेची माहिती शेतकरी सुनीता उईके यांनी वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेच्या हेल्पलाईन वर दिली.

संस्थेचे रेस्क्युअर अब्दुल कलाम, सैयद तोसीफ, वैभव काळे, अनिकेत उमरतकर, सुबोधकोवे, श्वेतल लांडगे, रिंकु लांडगे, अभी मायिंदे, नदीम शेख यांनी शेतात पोहचून जाळीच्या सहाय्याने माकडाला रेस्क्यू केले.

माकडाला श्वानांनी अनेक ठिकाणी चावा घेऊन जखमी केले होते,त्यातच स्वतःचा जीव वाचविण्यात माकड विहरीत पडल्याचा अंदाज वर्तविला आहे. रेस्क्यू नंतर माकडावर प्रथमोपचार करून माकडाला जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अजय वर्मा यांनी दिली.

आपल्या परिसरात कुठेही जखमी पशु पक्षी आढळल्यास वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक ९९६०४०३७३४ यावर संपर्क साधावा.
विहरीत पडलेल्या माकडाला वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेने दिले जीवनदान विहरीत पडलेल्या माकडाला वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड रिसर्च संस्थेने दिले जीवनदान Reviewed by सह्याद्री चौफेर on July 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.