सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे, (२९ जुलै) : प्रभाग क्र.१ मधील टाळगाव चिखली सोनवणे रस्ता हा खड्डेमय रस्ता म्हणून आता ओळखला जात आहे. ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वारंवार सूचना देऊन ही प्रशासन अधिकारी लक्ष देत नसल्याचा मनसेचे प्रभाग अध्यक्ष क्रं.१२ चे देवेंद्र निकम यांनी आरोप केला आहे.
चिखली - सोनवणे वस्ती रस्ता
मागील वर्षी ऑक्टोबर २०२० रोजी निवेदन देण्यात आल्यानंतर २३ जानेवारी २०२१ ला रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले परंतु ('फ') क्षेत्रीय कार्यालय येथील - स्थापत्य विभागाच्या मार्फत अत्यंत खालच्या दर्जाचे काम करण्यात आले,
यात मल - मूत्र व स्टॉर्म वॉटर लाईन विभाचा देखील तेवढाच मोठा कामचुकारिचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.
फेब्रुवारी २०२१ पासून ते जुलै २०२१ पर्यंत या रस्त्याला ड्रेनेज ची काम झाली, पाण्याची पाईप लाईन आली परंतु रस्त्याचे खोद काम झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करण्यात आले नाही.
वारंवार सूचना देऊन देखील अधिकारी काम करत नाही म्हणून आज सोनवणे वस्ती रोड वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या वृक्षारोपणाला स्थानिक व वाटसरूनी प्रतिसाद देत या रस्त्यातील खड्डे बुजवून दर्जेदार काम करावे असे मत व्यक्त केले.
वृक्षारोपण करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग १ टाळगाव चिखली येथील शाखाध्यक्ष प्रतिक बबन शिंदे, देवेंद्र निकम सहकारी, ऋषिकेश दादा पाटील, दत्ता धर्मे, नारायण पठारे, तुषार बनसोडे, मनोज दगडे, सुनी चव्हाण व अनेक महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.
मनसेचे प्रभाग क्र.१ मध्ये रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 29, 2021
Rating:
