सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (१७ जुलै) : कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील कोरोना आजाराचा प्रभाव लक्षात घेत, कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आवारपूर येथे दिनांक १७ जुलै रोज शनिवार ला कोविड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर कवठाळा यांचे सौजन्याने करण्यात आले.
आवारपूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणि हिरापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे आज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश बावणे यांनी आवारपूर गावामध्ये लसीकरण घेण्याचे प्रशासनाच्या नियोजीत सहकार्य करत डॉ. बावणे यांनी १७ जुलै ला कोविड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन हिरापूर- आवारपूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी कोविड लसीकरण शिबिराचा लाभ समस्त ग्रामस्थांनी घेतला असे मत सौ.दिवे यांनी म्हटले,
या शिबीरात बहुतांश नागरिकांनी सहभागी होऊन हिरापूर येथील (१००) तर आवारपूर येथील (२००) ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले आहे.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी आवारपूर-हिरापूर येथील सरपंच, उपसरपंच आदिंनी मोठया प्रमाणात सहकार्य केले. यावेळी डॉ. वैद्यकीय अधिकारी रमेश बावणे, CHO अश्विनी राहुलगडे, सिस्टर योगीता पत्रे, BF संगीता वानखेडे आणि अंगणवाडी सेविका व सर्व आशावर्कर उपस्थित होते.
आवारपूर-हिरापूर येथे कोविशील्ड लसीकरणाचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 17, 2021
Rating:
