राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा - गोर केसुला ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांची मागणी
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
नांदेड, (२८ जुलै) : अखंड भारतातील बंजारा समाजाचे श्रध्दास्थान धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासून देश सेवेचे कार्य हाती घेतले होते. दारूबंदी,हुंडाबंदी,अस्पृश्यता,अंधश्रदा,हिंदूरक्षक,धर्मजागृती आदी सुधारणे साठी अहोरात्र त्यांनी परिश्रम घेतला आहे. ते १५ करोड बंजारा समाजासह सर्वांचे श्रध्दास्थान असून बालब्रम्हचारी अखंड देवी तपस्या,अत्रत्याग करून तांडा ,वाडी,वस्ती,गाव,शहर पातळीवर संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले होते.
रामराव महाराज यांना मरणोत्तर त्यांना देशसेवेसाठी भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी गोर केसुलाचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केली.
राष्ट्रसंत डॉ.रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा - गोर केसुला ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2021
Rating:
