सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (ता. २ जून) : तालुक्यातील कोरोना संसर्गाचा स्तर कमी होतांनाचे चित्र काहीसे पाहायला मिळत आहे. बहुदा कोरोना मुक्तीकडे तालुक्याची वाटचाल सुरु असतांना तालुक्यातील ग्रामीण भागात आज बुधवारला एकही बाधीत रुग्ण नाही. मात्र, मारेगावात १ पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद प्रशासकीय दप्तरी झाली. कोरोनाची दुसरी लाट ओरसत असल्याने मारेगाव तालुक्याला सुखद अनुभव मिळाला आहे.
तालुक्यातील पॉझिटीव्ह आकडेवारीचा लपंडाव कायम होता. मात्र, आज आश्चर्यकारकरित्या शुन्य आकडेवारीने मारेगाव तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत शहराला नको म्हणता, १ पॉझिटीव्ह निघाल्याने नागरिकांना हळूच धक्का दिला. दरम्यान, रुग्णांचा आजचा दर शुन्यात असून जनतेला सुखद अनुभव मिळतो आहे.
तालुक्यातील ऍक्टिव्ह चा आकडा रोडावत केवळ ६६ वर आला. बरे होवुन परतलेले १९ जन आहेत. एकुणच आजच्या आकडेवारीने मारेगाव तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करित असल्याचे सकारात्मक संकेत आहे. मात्र, जनतेनी कोरोनाची लाट जरी ओसरत असली तरी गाफील न राहता नियम व अटीचे काटेकोर पालन करुन आपली दिनचर्या करावी.
मारेगावात केवळ १ पॉझिटीव्ह
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 02, 2021
Rating:
