टॉप बातम्या

नांदेड बस स्थानकात घुसले दोन अतिरेकी, पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडले दशतवाद्याना - पोलिसांचा मॉकड्रिल

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नांदेड, (ता.१२) : नांदेड शहरामध्ये अचानक दोन अतिरेकी घुसल्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पण दरवर्षी पोलीस प्रशासनाकडून अतिरेकी घुसल्यानंतर त्यांना कसं अटक केले जाते, याचे प्रात्यशिक केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या दलातील पॅरा कमांडो, सिआरपीएफ जवान, पोलीस कर्मचारी यांचा सहभाग असते. सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा अनेक ठिकाणी असे प्रात्यशिक दरवर्षी घेतले जातात. आज अचानक या नांदेड मध्यवर्ती बस स्थानकात प्रात्यशिकाची सुरुवात झाली. तेव्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस प्रशासनाकडून हे प्रात्यशिक आहे असं सांगण्यात आले तेव्हा, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रात्यशिकात पोलीस जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस टीम तसेच वजीराबाद पोलीसचे टीम आदरणीय भांडारवर साहेब व त्यांची टीम या सर्वांनी मिळून याठिकाणी रंगीत तालीम घेऊन ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांची दोन दहशतवादी अतिरेक्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. या रंगीत तालीम ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी ही प्रात्यशिक दाखवून कार्यवाही करण्यात आली असे, नांदेड पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी बस स्थानकात बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. 
Previous Post Next Post