टॉप बातम्या

वीजप्रवाह जोडणाऱ्या विद्युत तारांचा करंट लागून इसमाचा मृत्यू ; सोमनाळा येथील घटना

                      (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१२) : वीज खांबावरून घरगुती वीजप्रवाह जोडणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज १२ जूनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास सोमनाळा या गावात घडली. वाल्मिकी नामदेवराव ढोके (५७) रा. सोमनाळा असे या मृतकाचे नाव आहे. 
सोमनाळा गावातील वाल्मिकी ढोके यांच्या घरातील वीजप्रवाह बंद चालू होत असल्याने ते वीज प्रवाह जोडणाऱ्या विजेच्या तारांची पाहणी करण्याकरिता घराच्या टिनावर चढले. घरातील लाईन बंद असल्याने वीजप्रवाह जोडणाऱ्या तारांवर कार्बन चढले असावे म्हणून कार्बन साफ करण्याकरिता तारांना स्पर्श करताच त्यांना विजेचा जबर करंट लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाल्मिकी ढोके यांच्या घरी पीठगिरणी असल्याने दळण दळण्याकरिता येणारे ग्राहक वापस जाऊ नये, याकरिता घराच्या टिनावर चढून ते वीज प्रवाह जोडणाऱ्या तारा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असतांना विद्युत तारांचा करंट लागून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 


Previous Post Next Post