सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नंदुरबार, (ता.५) : आज दिनांक ५ जून रोजी आदिवासी महिला सौ. निशा पावरा शासकिय कर्मचारी आपले कर्त्तव्य बजावत असताना भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी ह्याने अमानुषपणे मारहाण करत जातीवाचक शिविगाळ केली. ह्या निर्दयी इसमाचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र कडून जाहीर निषेध केला आहे.
भाजप नगरसेवक गौरव चौधरी याची रेतीने भरलेली ओव्हर लोड ट्रक निशाताई व त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवली व गाडीची रॉयल्टी आहे का.? अशी ड्रायव्हर ला विचारणा केली असता, ड्रायव्हर ने काहीच न बोलता गाडी तळोदा रस्त्यावरून उड्डाण पुला खाली गाडी पळवली. दरम्यान,निशाताई व त्यांच्यां सोबत असलेल्या महिला कर्मचारी यांनी गाडीचा पाठलाग करत गाडी पकडली.
यावेळी तिथे गाडीचा मालक गौरव चौधरी व गुंड प्रवृतीचा त्याचा साथीदार ज्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला नयन चौधरी यांनी निशाताईला अमानुष पणे मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ केली. निशाताई यांना जोरदार धक्के मारून खाली पाडले. मी नगरसेवक गौरव असून माझी गाडी पकडते असे, असे धमकावून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अश्या वाळू माफियावर लवकरात लवकर (IPC ऍक्ट) section अ जा क 3 (11) 353,354, 323,504,506,(2) 34) अंतर्गत तसेच अट्रोसिटी एक्ट अंतर्गत जेरबंद करून कारवाई करावी व ह्याचे पद तात्काळ रद्द करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात जय आदिवासी युवा शक्ती,(JAYS) महाराष्ट्र अन्य संघटना रस्तावर उतरून निषेध आंदोलन करेल.
हा प्रकार राजकीय दबावाखाली सदर गुन्हा दाखल केला नाही तर, राज्यातील सर्व आदिवासी समाजाच्या विविध संघटना कडून तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.
नगरसेवक गौरव चौधरी कडून महिला कर्मचाऱ्यांना जातीवाचक शिविगाळ करीत केली मारहाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 06, 2021
Rating:
