वणी शहरात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा "शिवराज्याभिषेक" उत्साहात साजरा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (ता.६) : आज ६ जुन हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात "शिवराज्याभिषेक दिन" म्हणून साजरा होत असुन, वणीत युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकारातून आज दि.६ जुन रोजी येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला पंचामृत चढवुन अभिषेक करण्यात आला ,त्यानंतर भव्य भगवा झेंडा फडकावुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शिवजन्मोत्सव युवा मंडळ व शिवचरण प्रतिष्ठान यांनी परिश्रम घेतले. हितेश गोडे, राहुल झट्टे,योगेश आवारी,निखील तुराणकर,धनंजय खाडे,शुभम पावडे, गणेश आसुटकर,पवन मांडेकर, पवन बुर्हान, पवन पारशीवे, करण नागपुरे,विपुल कुकडे,नंदु मांढरे, विजय बोरकर, अमित गायकवाड, गौरव डोळके,आशिष चिडे,गुरुदेव चिडे, तूषार बलकी, स्वप्नील आवारी, आकाश धानोरकर, साहिल पारखी, गणेश निब्रड, सुबोध उमरे,सुरज आवारी, मंगेश डोंगे, निखील खामनकर, आकाश लडांगे,अक्षय मुरकुटे, दिनेश मुरस्कर, अमोल मडावी, ध्रुव येरणे उपस्थित होते.
वणी शहरात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा "शिवराज्याभिषेक" उत्साहात साजरा वणी शहरात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा "शिवराज्याभिषेक" उत्साहात साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on June 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.