टॉप बातम्या

मागील तीन दिवसांत आढळले केवळ कोरोनाचे दोन रुग्ण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.९) : तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आली असून संसर्ग होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. रुग्ण वाढीला ब्रेक लागला असून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. मागील दोन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आज केवळ दोन रुग्ण आढळले आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन व प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यात यश मिळाले. कोरोना आता तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आला आहे. आज दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२५२ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २५ वर आले आहेत. आज आणखी तीन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५१३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. 
तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती कमी झाल्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. ७ व ८ जूनला एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर आज ९ जूनला दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आज ३७ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तर आज करण्यात आलेल्या ८५ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्येही एकच पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ७८ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे अजून बाकी आहे. २५ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ रुग्ण कोविड केयर सेंटरला तर १६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. तर ६ रुग्ण यवतमाळ व इतरत्र भरती आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये रंगारीपुरा येथील एक तर मारेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

Previous Post Next Post