ओबीसी आरक्षणाकरीता आ.प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२६) : भाजपच्या वतीने आज दि.२६ जून २०२१ रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण महा विकास आघाडी सरकारच्या ओबीसी द्वेषामुळे आणि नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने रद्द झाले आहे. यासंबंधात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सवलतही दिली आदेशही दिला होता ही मागणी विशेष मागासवर्गीय आयोग स्थापन करून एम्पिरिकल डाटा सादर करण्यात यावा. परंतु राज्य सरकारची ओबीसी बाबत असलेली अनास्था द्वेष यामुळे सदर आयुक्त स्थापन करून एम्पिरिकल डाटा कोर्टाने दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे ओबीसी बांधवाच्या न्याय हक्काचा राजकीय आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

राज्य सरकारमार्फत ओबीसी वर जाणून-बुजून झालेला हा अन्याय ओबीसींचे राजकीय नेतृत्व संपविण्याची हे षड्यंत्र असल्याने या अन्यायाविरुद्ध तसेच सदर आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी महाराष्ट्र भाजपातर्फे राज्य सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन आज आयोजित करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने राळेगाव येथे माजी मंत्री तसेच आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात राळेगाव यवतमाळ रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले व राजकीय दृष्ट्या मागासलेल्या कष्टकरी मध्यम वर्गीय ओबीसी बांधवांनी आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी सर्व घटकातील समाज बांधवांनी बहुसंख्येने या आंदोलनात सहभाग घेतला व सलग दोन तास रास्ता रोको करून आंदोलन यशस्वी केले.

या वेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष  चिंतरंजन दादा कोल्हे, जिल्हा महामंत्री ऍड प्रफुलसिंह चौहान, सभापती प्रशांत तायडे, जी.प सदस्या सौ. प्रीतिताई काकडे, सौ.छायाताई पिंपरे, सौ. संतोषिताई वर्मा, सौ.विद्याताई लाड, गजानन लढी, संजय काकडे, अरुण शिवणकर, विनोद मांडवकर, बाळासाहेब दीघडे, संदीप तेलंगे, विशाल पंढरपुरे, सागर वर्मा, विनायक महाजन, आशिष इंगोले, किशोर गारघाटे, शारदानंद, विशाल येनोरकर, जैसवाल, शुभम मुके उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणाकरीता आ.प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन ओबीसी आरक्षणाकरीता आ.प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.