आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (ता.१२) : ग्रामीण भागात गेल्याकाही दिवसापासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप कमी झाला असून, नवीन रुग्णसंख्येत घट होत आहे. एप्रिल मे महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्याच्या तुलनेत खूपच कमी संख्या आढळत असल्याने प्रशासनाने जरा निर्बंध ही सैल केले आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची आस लागली असून, कोरोना उतरणीला लागल्याने शाळेच्या घंटा वाजण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा कालांतराने काही दिवस सुरु झाल्या होत्या; परंतु पुन्हा कोरोना परत फिरल्याने शाळा महाविद्यालये बंद करण्यात यावर्षी ही फेब्रुवारी आली. या वर्षीही महिन्यापासून कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढू लागले होते. मार्च मध्ये त्याचे प्रमाण दुप्पट तर एप्रिल मध्ये चार ते पाच पट वाढले होते. त्यामुळे शाळा सुरु होण्यास वा ऑफलाईन परीक्षा होण्याच्या आशा पूर्णतः मावळल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट जरा मंदावली असून, कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होऊ लागल्याचे सध्या चित्र आहे. नवीन रुग्ण संख्येतील घट आणि कोरोनामुक्तीकडे वाढता टक्का याचे सातत्य असेच राहिले तर शाळांची घंटा पुन्हा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनानेही जरा निर्बंध सैल केल्याने बच्चे कंपनी अर्थात सर्व वयोगटातील विद्यार्थीही शाळेसाठी आसूसले असून, त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जून महिन्याच्या १५ तारखेपासून साधारणपणे सर्व शाळा सुरु होतात. अजूनही कोरोनाचे सावट असल्याने त्याची तीव्रता आजून कमी झाली तर जरा उशिराने शाळा सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांसाह पालकांनी शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु केली असून, काहींनी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दुकाने उघडण्यास मिळालेल्या परवानगीनंतर सुरु झालेल्या दुकानामधून साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. सध्या सायंकाळपर्यंत सर्वप्रकारची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक व स्टेशनरी साहित्याच्या दुकानावर गर्दी उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शाळेबाबत शासन स्तरावर अजून काहीच हालचाली नाही; परंतु कोरोना आटोक्यात आल्यावर विचार होईल याची खूणगाठ बांधत बच्चे कंपनीसह पालकवर्ग तयारीत आहेत.
आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची Reviewed by सह्याद्री चौफेर on June 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.