'गंगुबाई काठीयावाडी' ची शूटिंग पूर्ण


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२८) : सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियाडवाडी' या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांची ही उत्सुकता शिगेला जाऊन पोहचली आहे. 'क्युट' अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण स्टारर 'गंगुबाई काठियाडवाडी' चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालीय.
लॉक डाऊन मुळे या चित्रपटाचं एक गाणं आणि छोटया भागातील शूटिंग राहिली होती. अनलॉक नंतर या चित्रपटाची उरलेल्या शूटिंग ला सुरुवात करण्यात आली होती.
ती आता पूर्ण झाली असून हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. याबाबत अभिनेत्री आलिया भट्ट ने स्वतः ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटोज शेअर करून ही माहिती दिलीय. हे फोटो शेअर करताना आलियाने लिहिलं '८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्यानंतर २ वर्षांनी आम्ही या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय. या चित्रपटाने दोन लॉक डाऊन, दोन चक्रीवादळ आणि ब? याच समस्यांचा सामना केलाय. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही.
'गंगुबाई काठीयावाडी' ची शूटिंग पूर्ण 'गंगुबाई काठीयावाडी' ची शूटिंग पूर्ण Reviewed by सह्याद्री चौफेर on June 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.