टॉप बातम्या

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत आपल्या जीवाची बाजी लावत सर्वसामान्य जनतेसाठी देव झालेल्या देवदूतांना....मनसेचा सलाम..


सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (ता.१५) : मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाणे यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भुयार सर, आणि खऱ्या अर्थाने रुग्णांसोबत राहून त्यांची सेवा करणाऱ्या परिचरिकांचा आज मनसेचे अनिल हमदापुरे, साजिद शेख, दीपक आडे, विनोद दोंदल, आशिष सरूरकर गजानन पोटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात अत्यंत बिकट परिस्थितीत ज्यावेळी आपले सख्खे ही रुग्णांच्या दूर पळत होते अश्या स्थितीत या वैद्यकीय अधिकारी आणि परिचरिकांनी त्यांची अहोरात्र सेवा केली.जिल्ह्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने देवदूत झालेल्या या आरोग्य सेवकांचा सत्कार करून मनसेने त्यांना हा एक त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव असून त्याची ऋण न फेडता येणारे आहे आणि हा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, परिचारिका, रुग्णसेवक, कंत्राटी कर्मचारी यांना मनसे तर्फे मानाचा मुजरा असून येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून अशीच सेवा घडो असे मत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.या सत्कार प्रसंगी बोलताना डॉ. भुयार सर आणि परिचरिकांनी मनसेचे आभार व्यक्त करत कार्याची दखल घेतल्याबद्दल मनसेचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.


Previous Post Next Post