सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (ता.१७) : हिंगोली मतदार संघातील नगर परिषद आणि नगर पंचायत अंतर्गत घरकुल योजनेचा कोरोना विषाणूच्या मागील अनेक दिवसांपासून रखडला होता. यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सामान्य घरकुल लाभार्थ्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. निधी अभावी अनेक लाभार्थ्यांची बांधकाम रखडल्या गेले होते. तर काहीनी उधार खरेदी केली व व्यापाऱ्यांचे तगाद्यामुळे जगणे मुश्कील झाले होते.
दिनांक १० एप्रिल रोजी पासून खासदार हेमंत पाटील यांनी केन्द्रीय गृहनिर्माण मंत्री हारदिप सिंग पुरी यांची भेट घेऊन,याबाबत केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हिंगोली मतदार संघात येणाऱ्या एकूण १० हजार ५७४ घरकुला करीता एकूण ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
याबाबतचे नुकतेच पत्र प्राप्त झाले असून ६ नगरपरिषदा आणि ५ नगर पंचायतीच्या ५० कोटी मंजूर निधीतून महागांव नगर पंचायत करीता ३ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहे. घरकुलाच्या निधीचा एक वर्षाचा कार्यकाळ लोटूनही निम्मे हप्ते न मिळाल्याने महागांव शहरातील लाभार्थ्यांनी अनेक वेळा तहसील कार्यालया समोर धरणे, आंदोलन,उपोषण सुध्दा केले होते. परंतू संबंधितांनी निधी उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून जबाबदारी झटकली होती.
यामुळे लाभार्थ्यामध्ये निराशाचे सुर निर्माण झाले होते. परंतु खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यशआल्याने व निधी उपलब्ध करून दिल्याने महागांव येथील घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खासदार हेमंत पाटील यांचे वर लाभार्थ्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने तो राज्याच्या नेत्यांनी मंजूर करून आणण्याचा प्रश्न उद्भवत नाही,दुर्दैवाने काही नेतेमंडळी ह्याचे श्रेय घेत आहेत.
घरकुल असावे हे सर्व सामान्य नागरिकांचे स्वप्न आहे. आणि ते त्यांना मिळायलाच हवे, परंतु यामध्ये कोणतेही राजकारण नको. असेही खासदार हेमंत पाटील यांनी म्हणाले.
महागाव नगर पंचायतला मिळणार ३ कोटी ७१ लाख रुपयांचा घरकुल निधी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 17, 2021
Rating:
