ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा तालुका काँग्रेस कमिटीकडून निषेध; तहसिल प्रशासनाला दिले निवेदन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२६) : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी चे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या सर्व प्रकाराला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असून केंद्र सरकारने जाणीव पूर्वक ओबीसी चे आरक्षण रद्द केले असा, आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. 
यावेळी बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जि.प.सदस्या अरुणाताई खंडाळकर, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मारोती गौरकर, जि. प. सदस्य अनील देरकर, पं. समिती सभापती शितल पोटे, शेख युसूफ शेख नबी, शशिकांत आंबटकर, विनोद आत्राम, यादवराव काळे, यादवराव पांडे, रविंद्र पोटे, रविंद्र धानोरकर, आकाश बदकी, शंकर मडावी, दुष्यंत जयस्वाल आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा तालुका काँग्रेस कमिटीकडून निषेध; तहसिल प्रशासनाला दिले निवेदन ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा तालुका काँग्रेस कमिटीकडून निषेध; तहसिल प्रशासनाला दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.