यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी विलास मेंडके तर यवतमाळ शहर अध्यक्ष पदी प्रदीप कोरी यांची निवड - पूर्व विदर्भ अध्यक्ष चेतन आगलावे यांची माहिती

सह्याद्री न्यूज | राजविलास किनाके 
यवतमाळ, (ता.०१ जून) : राष्ट्रनायक मा.महादेव जानकर साहेबांच्या विचारांचा वारसा जपत,मा. बाळासाहेब दोडतले व मा.आ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या प्रेरणेने सकारात्मक समाज निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी विदर्भ अध्यक्ष 
चेतनभाऊ आगलावे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती चे औचित्य साधून कोरोना काळानंतर प्रथमच संघटन बांधणी, पक्षबांधनी ला सुरुवात केली.
जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ मेंडके यांना त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष पदावर पदोन्नती देऊन
यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली.
युवकांच्या गळ्यातील ताईत ,सामाजिक कार्याची आस असणारे प्रदिप कोरी यांची यवतमाळ शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. दोन्ही नियुक्ती वर जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी आनंद व्यक्त केला.
मा.महादेव विचारांचा सोन्याचा वारसा जपत दोन्ही पदाधिकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे हात अधिक बळकट करतील,यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकीत पक्ष सर्वांना धक्का देत विजयी घोडदौड करेल असा विश्वास या वेळी राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भ अध्यक्ष ( पुर्व विभाग )चेतन भाऊ आगलावे यांनी केला.
"सत्यशोधन- समाजप्रबोधन-राष्ट्रनिर्माण"
या मुल मंत्रासह बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी,
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी - उपेक्षितांना अपेक्षित जागा देण्यासाठी, आणि सकारात्मक समाज निर्माणासाठी राष्ट्रनायक मा महादेव जानकर साहेबांचे कार्यकर्ते व राष्ट्रीय समाज पक्ष वचनबद्ध आहे.
सकारात्मक समाज निर्माणासाठी समाजातील प्रत्येक घटकांना राष्ट्रीय समाज पक्षात सामील होण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष चेतन भाऊ आगलावे यांनी केले.

आपला 

चेतन आगलावे
विदर्भ अध्यक्ष ( पुर्व विभाग)
राष्ट्रीय समाज पक्ष
७२६४०१५८२८.
यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी विलास मेंडके तर यवतमाळ शहर अध्यक्ष पदी प्रदीप कोरी यांची निवड - पूर्व विदर्भ अध्यक्ष चेतन आगलावे यांची माहिती  यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी विलास मेंडके तर यवतमाळ शहर अध्यक्ष पदी प्रदीप कोरी यांची निवड - पूर्व विदर्भ अध्यक्ष चेतन आगलावे यांची माहिती Reviewed by सह्याद्री चौफेर on June 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.