सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (ता.२५) : आज शनिवार रोजी बीड शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षरोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे अतिथी नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाची संपादक मा.श्री वैभव जी स्वामी यांच्या मातोश्री जगदेवी स्वामी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बीड शहरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच ग्रामीण भागांमध्ये देखील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, आणखीन दोन ते तीन दिवस हा वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत वैभव स्वामी यांनी व्यक्त केले.
आज बीड शहरांमधील मध्यवर्ती ठिकाण असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसरात स्वामी साहेबांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी हितोपदेश वडमारे, किशोर सोनवणे, संजय देवा कुलकर्णी पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्ह्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वैभवजी स्वामी यांच्या मातोश्रीच्या स्मृतिदिनानिमित्त बीड शहरात वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 26, 2021
Rating:
