सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (ता.८) : पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी सोमवार दि.७ जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदशनानुसार व युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये रिपाइंने कोरोनाचे नियम पाळून तीव्र निदर्शने केली.
महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार आहे असल्याचे मत पप्पू कागदे यांनी निदर्शनात व्यक्त केले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हंटल आहे की, पदोन्नतीमधील मागसावर्गीयांच्या आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यासह बीडमधये जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यलयावर १ जून ते ७ जूनपर्यंत रिपाइं तर्फे आंदोलन सप्ताह करण्यात आला आहे.
पदोन्नतीमधील मागसावर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी नाही लावल्यास युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राज्यभर आंदोलन केले जाईल. अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
यावेळी मझहर खान, राजु जोगदंड, किसन तांगडे, बापू पवार, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, महेंद्र वडमारे, सुभाष तांगडे, प्रभाकर चांदणे, दिलीप खंदारे, भाऊसाहेब कांबळे, भैय्या मस्के, सतीश शिनगारे, श्रीमंत जाधव, माजी. सरपंच नागेश शिंदे, दिपक अरुण, आप्पा मिसळे, भास्कर जावळे, अशोक दळवी, रतन वाघमारे, भीमराव घोडेराव, अशोक वक्ते सर, श्रीमंत जाधव, धम्मा पारवे, गौतम कांबळे, मिलिंद पोटभरे, सचिन वडमारे, विश्वनाथ गव्हाणे, अनिकेत कांबळे, कपिल इनकर, विजय डोळस, मंगेश डोळस, विशाल इंगोले, विलास जोगदंड आदी पदाधिकारी, कार्यकार्त्यांची उपस्थिती होती.
पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपाइंची तीव्र निदर्शने
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 08, 2021
Rating:
