~: अ|भि|ष्ट|चिं|त|न •||• वा|ढ|दि|व|स :~
💐 बाबुजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂
पदाच्या प्रतिष्ठेपेक्षा समाजसेवेची ओढ, राजकीय वाटचालीपेक्षा माणुसकीच्या नात्यांना जपणारे आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात मनापासून सहभागी होणारे मा श्री विजय बाबुजी चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी कार्यरत राहणे, हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
आपल्या विचारांनी आणि कार्याने अनेकांना प्रेरणा मिळत राहो. आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि समाजसेवेच्या कार्यासाठी नवी ऊर्जा लाभो, हीच श्री जैताई चरणी मनःपूर्वक प्रार्थना! 🙏
🎉 बाबुजी, आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
शुभेच्छुक : श्री जैताई अन्नछत्र समिती, वणी