टॉप बातम्या

वणीत ‘मुन्ना पान सेंटर’वर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याच मोहिमेंतर्गत रविवारी दुपारी वणी शहरातील साने गुरुजी नगर परिसरातील फाले लेआउट येथील मुन्ना पान सेंटरवर छापा टाकून तब्बल ३ लाख ५१ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ येथील पाच सदस्यीय पथकाने रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. तपासणीदरम्यान दुकानात प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच सुपारीचा साठा आढळून आला. पथकाने संबंधित सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.
या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मुन्ना नवनाथ बेलेकर याच्याविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित पदार्थांची विक्री अथवा साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();