अभिष्टचिंतन!
कर्तव्यदक्ष, अभ्यासू, संघटनकुशल व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा देणारे, भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. ॲड. प्रफुलजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कुशल नेतृत्वामुळे पक्ष संघटनाला नवी दिशा व बळ प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांशी असलेला आपला जिव्हाळ्याचा संबंध, समाजहिताची तळमळ आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड यश लाभो. आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम होत राहो तसेच समाजसेवा व जनकल्याणाच्या कार्यात आपणास उत्तरोत्तर यश मिळत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक :
अविनाश लांबट
तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, मारेगाव.