टॉप बातम्या

भक्ती, एकता आणि सेवाभावाचा संदेश; मार्डीत महावीर जयंती साजरी


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : वर्धमान भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मार्डी येथे जैन समाजाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करत उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर कल्याणक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धार्मिक वातावरणासोबत सामाजिक बांधिलकीही अधोरेखित झाली.
गावातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. यानिमित्त मार्डी गावातून आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. जयघोष, पताका आणि सजवलेल्या रथामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमस्थळी महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच गीत, नृत्य व इतर सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला रंगत आली.
दरम्यान, सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मार्डी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुमारे ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. एकनिल ब्लड सेंटर, यवतमाळ यांच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मार्डी, मारेगाव, कुंभा, खैरी, वडकी, पिंपळापूर, वनोजादेवी व मजरा येथील जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. किशोर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, अजय भंसाळी, अमित दुगड, रितेश झामड, प्रशांत भंडारी, निकेश कोठेचा यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();