सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिंदे सेनेच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. कुणाल चोरडिया यांनी शिंदे सेनेत प्रवेश करताच प्रचाराचे रणांगण अधिक रंगतदार झाले असून, त्यांनी शहरातील ठळक समस्या अधोरेखित करत जोरदार प्रचार मोहीम राबवली.
चोरडिया यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन रॅलीला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय ठरला. शहराच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडणाऱ्या शिंदे सेनेच्या या प्रचाराने प्रभागात चांगलीच चर्चा रंगवली आहे.
उच्चशिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम यांच्यासह प्रभागातील उमेदवारांनाही नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यांच्या युवा नेतृत्व म्हणून कौतुक व्यक्त होत आहे.
प्रचार रॅलीदरम्यान कुणाल चोरडिया, विनोद मोहितकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम तसेच प्रभागातील सर्व उमेदवार आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.