सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापले असून, प्रचाराला अंतिम टप्प्यात जोरदार वेग आला आहे. अशातच प्रभाग क्रमांक १ मध्ये विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात शिंदे सेनेने भव्य शक्ती प्रदर्शन करून संपूर्ण प्रभाग दणाणून टाकला.
विजय चोरडिया यांनी निवडणुकीची धुरा हाती घेताच प्रचारात उत्साहाचे नवे वारे वाहू लागले. सर्व प्रभाग पिंजून काढत घराघरांत पोहोचलेल्या या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.
यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते विजय चोरडिया यांच्या लाडक्या बहिणीच्या सक्रिय सहभागाने. तिच्या उपस्थितीने आणि प्रभागात केलेल्या संवादाने रॅलीला वेगळाच उर्जा मिळाली. शिंदे सेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार,सौ किरताई विश्वस नांदेकर, शहराध्यक्ष शिवराज पेचे, उप ता. अनिल उलमाले, धीरज राजुराकर, संजय आवारी, संदीप वाघमारे, अनिल ढगे, प्रवीण पिसे, उमेद चिकटे, समीर कुटनाके, गौरव केराम, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु पायल तोडसाम व उमेदवार यासह शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.