टॉप बातम्या

मार्डी येथे संत नगाजी महाराज जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावतालुक्यातील मार्डी येथे संत नगाजी महाराज जयंती महोत्सव मोठ्या श्रद्धाभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या धार्मिक महोत्सवात विविध कार्यक्रमांद्वारे समाज प्रबोधनाची मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळाली.

पहिल्या दिवशी, शुक्रवारी सकाळी पारंपरिक विधीपूर्वक घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सिंदी महागाव येथील गुरुदेव सेवा मंडळ यांच्या भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले.

शनिवारी पहाटे ६ वाजता श्रींचा अभिषेक व पोथी पारायणाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळी १० वाजता संत नगाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध भजन मंडळांच्या सहभागामुळे मिरवणूक अधिकच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

दुपारी १ वाजता सप्तखंजेरी वादक कु. जान्हवीताई सोपान घुमे यांच्या जाहीर समाज प्रबोधन कीर्तनाने कार्यक्रमाला शिखर गाठले. त्यांच्या प्रभावी वाणीतून झालेल्या कीर्तनामुळे परिसर धर्मभावनेने आणि अध्यात्मिक वातावरणाने न्हावून निघाला.

दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक युवा क्रांती बहुउद्देशीय संस्था तसेच समस्त नाभिक समाजातील युवा व महिलांनी उल्लेखनीय पुढाकार घेतला.

कार्यक्रमाच्या यशात निरंजन येसेकर, राजू चौधरी, नगाजी वाटेकर, मनोज चौधरी, मनिष धाबेकर, गोलू दाभेकर, विकास क्षीरसागर, रमेश दर्वे, गणेश दर्वे, चेतन क्षीरसागर यांच्यासह समाजातील अनेक बांधवांनी आणि भगिनींनी मोलाचा सहभाग व परिश्रम दिले.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();