टॉप बातम्या

वणी येथे 'नमो युवा रण' स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीभारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर पासून झाला असून 2 आक्टोबर पर्यंत असणार आहे. याचाच भाग म्हणून वणी येथे “नमो युवा रण स्पर्धा” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मॅरेथॉन २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धाव घेणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहणार आहेत.

या मॅरेथॉनमध्ये 16 वर्षांखालील मुले- मुलींसाठी 2.5 किमी धाव आणि 16 वर्षांवरील स्पर्धकांसाठी 3.5 किमी धाव असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटातून तीन प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र सुद्धा वितरण करण्यात येणार आहे.

या उपक्रमाला भाजप शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, स्थायी समिती चे सदस्य विजय चोरडिया, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, उपाध्यक्ष तथा ॲड.कुणाल चोरडिया तसेच माजी सभापती संजय पिंपळशेंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रथम पारितोषिक : 'अ' गट 8000/-, 'ब' गट ₹ 5000/-, द्वितीय पारितोषिक : 'अ' गट ₹2000/-, 'ब' गट ₹ 3000/-, तृतीय पारितोषिक : 'अ' गट 1000/-, 'ब' गट ₹ 2000/-

नशामुक्त भारत या जनजागृतीपर उद्दिष्टाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, स्पर्धेत प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. सहभागी होण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असून नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळीच ठिकाणी करण्यात येणार आहे, असे आयोजकांनी कळविले.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असें आवाहन आयोजकांनी केले.




Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();