टॉप बातम्या

नवरात्रोत्सवात अन्न पदार्थातून विषबाधा टाळा !

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : नवरात्रौत्सवात उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर भगर विक्री केली जाते. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित या धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 

शहर व तालुक्यातील भगर विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणी सुरू असून, भेसळ किंवा निकृष्ट दर्जाच्या भगरची विक्री केल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


अन्न व औषध प्रशासनाचे पथक बाजारपेठांमध्ये नियमित पाहणी करत असून, नागरिकांनाही शंका आल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून भेसळयुक्त पदार्थांची विक्री टाळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. तालुक्यात भेसळ किंवा निकृष्ट दर्जाच्या भगरची विक्रीहोत असल्यास कळवावे.

~उत्तम निलावाड

 तहसीलदार तहसील कार्यालय, मारेगाव 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();