सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुका शिवसेना (उबाठा) यांच्या वतीने तालुक्यातील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी २२ सप्टेंबरपासून मार्डी येथील आठवडी बाजार चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत-
• विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १३२ के.व्ही. सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करावे.
• शेतकऱ्यांचे कर्ज त्वरीत माफ करावे.
• तालुक्यात वाढलेल्या अवैध धंद्यांवर तातडीने बंदी घालावी.
• खड्डेमय ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल करावी.
• अतीवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा.
• ३ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्राचा अहवाल जाहीर करावा.
या मागण्यांसाठी तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, दिवाकर सातपुते, सचिन पचारे, विजय अवताडे, शरद ताजने यांनी उपोषण सुरू केले असून, तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.