टॉप बातम्या

वणी वाहतूक उपशाखेला 10 बॅरिकेट्स भेट-लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी - वणी परिसरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. विविध ठिकाणी रस्त्याचे काम असते. यामुळे परिसरात अनेकदा वाहतुकीची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्षा संगिता खाडे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय खाडे यांच्या माध्यमातून वणी वाहतूक उपशाखेला 10 बॅरिकेट्स भेट देण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास रस्ते बंद करणे, सण उत्सवाच्या वेळी वाहतूक वळवणे, प्रगतीपथावर असलेले क्षेत्र दर्शवणे, अपघातांचा धोका कमी करणे, वाहनांना सुरक्षितपणे मार्ग दाखवणे इत्यादी साठी बॅरिकेट्सची गरज भासते. वणी वाहतूक उपशाखेकडे बॅरिकेट्सची कमतरता लक्षात घेऊन संगिता खाडे यांच्या माध्यमातून 10 बॅरिकेट्स भेट देण्यात आले. मंगळवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एका छोटेखानी कार्यक्रमात हे बॅरिकेट्स वाहतूक शाखेकडे वितरीत करण्यात आले. 

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी पतसंस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार गोपाळ उंबरकर, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग विजय महाले यांच्यासह पुरुषोत्तम आवारी, प्रकाश धवळे, संदीप कांबळे, वैभव डंभारे, गणेश लडके, तेजराज बोढे, कविता चटकी, वंदना धगडी, शारदा ठाकरे, निशा गौरकार, सुनिता बोढे, चेतन मांडवकर, अनुराग आयतवार, सचिन ढवस, कैलास खिरटकर यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post