टॉप बातम्या

विजेच्या झटक्क्याने बैल दगावला, शेतकरी चिंतेत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील एका शेतकऱ्याचा बैल अचानक आलेल्या पाऊस आणि विजेच्या कडक्यात दगावल्याने, शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. कपाशीची डवरणी आणि इतर शेतीची कामे करण्यासाठी बैलाची अत्यंत आवश्यकता असते, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

शेतकरी विनोद प्रल्हाद चंदनखेडे रा.मार्डी यांच्या मालकीचा बैल,15/8/2025 शुक्रवार सायंकाळी 6.00 ला आलेल्या दमदार पाऊस आणि विजेच्या कडाक्यात, मार्डी येथे आदर्श हायस्कूल जवळ वीज पडून जवळच बांधून असलेल्या दोन बैलापैकी एक बैल जाग्यावर मरण पावला. त्यामुळं विनोद चंदनखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. 

ऐन हंगामात आणि पोळा सण अगदी जवळ आला असताना शेतीसाठी दुसऱ्या बैलाची व्यवस्था कशी करायची, यामुळे ते चिंतेत आहे. तलाठी सरनाईक आणि पशुवैद्यकीय अधिकारी ह्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आले. परिणामी शेतकरी चंदनखेडे यांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
Previous Post Next Post