टॉप बातम्या

मारेगाव तालुक्यातून लाडक्या भावासाठी लाडक्या बहिणीने पाठवल्या राख्या

सह्याद्री चौफर | ऑनलाईन

मारेगाव : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने "आपला भाऊ देवाभाऊ" या उपक्रमांतर्गत मारेगाव तालुक्यातून लाडक्या भावासाठी लाडक्या बहिणीने राख्या पाठवल्या. मारेगाव तालुक्यातील युवा नेतृत्व तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली, सरचिटणीस प्रशांत नांदे, प्रभारी संध्या लोढे,संयोजिका शालिनी दारुण्डे, सह संयोजिका दीपिका रस्से, व भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड.प्रफुल्ल चव्हाण यांना सुपूर्द केल्या. 

जवळपास 1 लाख 13 हजार 905 राख्या यवतमाळ जिल्ह्यातून लाडक्या देवाभाऊ मुंबई साठी पाठवण्यात आल्या आहे. यामध्ये मारेगाव तालुक्यातून 4 हजार पॅकेट आणि 9721 राख्या देवाभाऊ साठी पाठवल्या. ही सर्वात अभिमानाची बाब लाडक्या बहिणीसाठी आहे. असं जिल्हाध्यक्षांनी भावना व्यक्त केली. 

मारेगाव तालुक्यातून लाडक्या देवाभाऊ साठी राख्या सोबतच पत्र सुद्धा पाठवून बहीण भावाच्या नात्याला उजाळा दिला. देवा भाऊने जो सक्षमतेचा आधार दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सोबतच आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते देवा भाऊंनी केल्यामुळे आम्ही सदैव देवा भाऊच्या पाठीशी आहे, हा संदेश त्यांनी पाठविला. या उपक्रमासाठी मारेगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post