सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मृतक हा भंगार वेचून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याला मद्याचे व्यसन असल्याचे कळतेय. अशातच दिनांक 18 ऑगस्ट 2025 ला विवस्त्र अवस्थेत मृतदेह त्याचा एका ले-आऊट च्या मोकळ्या जागेवर आढळून आला होता. आठ दिवसापूर्वी पहाटे एका बियरबारच्या मागे गौरी ले-आऊट परिसरात त्याचा संशयास्पद विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. सकाळी गौरी ले-आऊट परिसरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दृष्टीस पडल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला.
विविधांगी मार्गाने घटनेचा तपास करण्यात आला, सर्व तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीने कार्य करत असताना या बहुचर्चित गंभीर घटनेचा उलगडा झाला. आशिष कटोते नामक तरुणाला अटक करून त्याची कसून चौकशी सुरु आहेत.
तपासात हे कारण आले समोर :
आशिष याने देवराव गुंजेकर याला निर्जनस्थळी नेल्यानंतर त्याला तू रात्री माझे पैसे व मोबाईल का हिसकावला असा प्रश्न केला असता त्यांच्यात आणखी जोरदार वाद झाला. वाद मारहाणी पर्यंत पोहचला आणि आशिषने रागाच्या भरात देवराव गुंजेकर याच्या डोक्यात दगड घालून ठार केले.