टॉप बातम्या

आदिवासी समाज भवनासाठी आदिवासी सोशल फोरमची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाचे भव्य समाजभवन व्हावे यासाठी आदिवासी सोशल फोरम च्या वतीने मा. ना डॉ. अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांना निवेदनातून मागणी केली होती. आदिवासी समाज भवनासाठी गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी सोशल फोरम सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यासाठी मंत्री ना. डॉ. अशोक उईके आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांनी  दि.13 जुलै 2025 रोजी स्थानिक शेतकरी मंदीर हॉल,वणी येथील सत्कार समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी समाज भवनासाठी दोन कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.

वणी या ठिकाणी शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी आदिवासी समाज बांधवाकरिता कोणत्याही प्रकारचे आदिवासी समाज भवन उपलब्ध नाही. असे नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात मागणी कर्त्यांनी म्हटलं आहे. 

शहरात आदिवासी समाजाचे समाज भवन आता तरी व्हावे, या साठी वणी न.प. हद्दीतील जागा आदिवासी समाज भवनासाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी फोरम च्या वतीने वणी नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी सोशल फोरम वणी मार्फत देण्यात आलेले निवेदन मा. ना. मंत्री महोदय यांनी मुख्याधिकारी न.प.वणी यांच्याकडे जागा मागणीचे निवदेन सुपूर्द केले आहे. आता नगर परिषदने त्यांच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा आहे. असे फोरमचे अध्यक्ष रमेश मडावी यांनी 'सह्याद्री चौफेर'शी बोलताना सांगितले. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();