सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सरकारी कामाच्या वेळात अडथळा निर्माण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका जणा वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना वणी तहसील कार्यालयात दि.25 जुलै रोजी घडली असून त्याच दिवशी दुपारी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी ही तिचे कार्यालयात कामाच्या ठिकाणी हजर असताना यातील आरोपी हा तिथे आला व त्याने फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी कु. मथुरा मोरेश्वर राजुरकर,वय 24 वर्ष धंदा नौकरी रा. पटवारी कॉलनी लालगुडा, वणी ही तिथुन फोन करण्याकरीता बाहेर जात असतांना तिचे जाण्याच्या मार्गावर उभा झाला व तो तिला बाहेर जाण्यास अडथळा करीत होता.
त्याने तिच्या कार्यालयीन कामामध्ये अडथळा निर्माण केला व तिचेकडे वाईट नजरेने पाहुन शिवीगाळ केली तसेच तिचे टेबल वरील काच फोडला. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट महेश विठ्ठल वैद्य (49) रा लालगुडा, वणी याचेवर कलम 221, 296, 324 (4), 352, 351(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहे.