सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कामगार, शेतकरी, शेतमजूर, आशा, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी व युवकांनी दिनांक ९ जुलै चा देशव्यापी संपाला पाठिंबा देत वणी येथे भर पावसात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अ. भा. किसान सभा व सिटू चा वतीने टिळक चौकातून मोर्चा काढून देशातील भाजपचा मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या जनविरोधी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक व महिला विरोधी कायदे आणि धोरणाविरोधात निषेध व विरोध करीत महामहीम राष्ट्रपतीला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
काय होत्या देशव्यापी संपाचा मागण्या?
कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व कॉ. ॲड. दिलीप परचाके यांच्या नेतृत्वात या मोर्चात १) देशातील संघटित, असंघटित कामगार व विशेषता ठेका कामगारांचे संविधानिक अधिकार हिरावून त्यांना बंधुआ मजदूर बनवू पाहणाऱ्या चार श्रम संहिता कायदा रद्द करा, २) नागरिकांचे संविधानाने दिलेल्या अधिकारांची गळचेपी करणारे महाराष्ट्रात आणत असलेले जन सुरक्षा विधेयक रद्द करा, ३) अंगणवाडी, आशा शालेय पोषण आहार कर्मचारी व शेतमजुरांना कामगार सुविधा लागू करून रुपये 26000/- किमान वेतन लागू करा, ४) शेतकऱ्यांचा शेतमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, ५) विजेचे नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा, विजेचे दर कमी करा, शेतकऱ्यांचा वीज पंपाला सतत बारा तास वीज पुरवण्याची हमी द्या, ६) मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान 200 दिवस काम व रु. ६००/- प्रतिदिन मजुरी द्या, शहरी भागात मनरेगा योजना सुरू करा, ७) ६० वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला प्रति महिना रुपये ५०००/- लागू करा, ८) खाजगीकरणाचा नावाखाली सरकारी उद्योग व संपत्ती उद्योगपतींचा हवाली करणे बंद करा, ९) वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कोणत्याही दोन पुराव्याचा आधारावर अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या, १०) गायरान, देवस्थान व रेव्हेन्यूच्या जमिनीचे पट्टे द्या, तसेच गैर आदिवासी अतिक्रमण धारकांना वन जमिनीचे पट्टे द्या आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कॉ. श्यामराव जाधव यांनी गायली क्रांतिकारी गीते
भर पावसात तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर जाहीर सभा घेऊन त्या ठिकाणी देशव्यापी संपाचे कारण सांगून आणि मोदी सरकार तसेच राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या जनविरोधी धोरणांची चिरफाड कडून उपस्थितांना मार्गदर्शन माकप चे जिल्हा सचिव कॉ ॲड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष कॉ. गीत घोष यांनी केले. या जाहीर सभेत कॉ. श्यामराव जाधव यांनी त्यावेळेस क्रांतिकारी गीते सादर केले.
या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी मनोज काळे, गजानन ताकसांडे, कवडू चांदेकर, रामभाऊ जिद्देवार, संजय वालकोंडे, ऋषी कुळमेथे, महेश सोनटक्के, प्रकाश घोसले, सुभाष नांदेकर, शंकर गाउत्रे, श्रीकांत तांबेकर, संजय कवाडे, राजू पुडके, शांताबाई उरकुडे, मेघा बांडे, धनराज भोयर, सुरेश भोयर, बापूजी येरकडे, बंडू मात्कुलवार यांनी अथक परिश्रम घेतले.