9 जुलैला भाकपचा भव्य निदर्शने मोर्चा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 घटनाविरोधी असल्यामुळे मागे घेण्यात यावे,अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टा द्या व जमिनीवरून हुसकावून लावणे बंद करा,अंगणवाडी सेविका, बालवाडी, आशा, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत कामगार, मोलकरीण स., मदतनीस, वाहन चालक युनियन, मानधन नको वेतन द्या, शेती करता पांदण रस्ते. करण्यात यावे व शेती पंपाला 24 तास मोफत वीज पुरवठा करा,यासह इतरही विविध मागण्या घेऊन शेतकरी युनियन, किसान सभा, आयटक संलग्न भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने दि. 9 जुलै रोज बुधवार ला दुपारी 1 वा. करण्यात येणार आहे, अशी माहिती या मोर्चाचे प्रमुख कॉ. बंडू गोलर यांनी दिली.
भारतातील कामगार, शेतमजूर, शेतकरी व युवकांचे सर्व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून देशातील व मारेगाव तालुक्यात आत्महत्येची धग सुरू आहे. दर हप्त्याला दोन आत्महत्या सतत सातत्याने होत आहे. व आत्महत्या मध्ये 40 ते 55 वयोगटातील शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगारांच्या आत्महत्या होतांना निदर्शनात येत आहे. या आत्महत्या का होत आहे? याबद्दल मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाला सरळ सरळ बक्षीस देणे सुरू केले आहे. असं भाकप च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं गेले आहे. 
Previous Post Next Post