Top News

FIR दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला शोधलं

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : चक्क दुरुस्तीसाठी आणलेल्या कारच्या डिक्की मधून साडेसात तोळे सोन्याचा एकूण सात लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत ठाण्यात तक्रार प्राप्त होताच वणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 30/05/2025 रोजी पोलीस ठाणे वणी येथे फिर्यादी रवींद्र रामदास राजूरकर रा. मोहदा (ता.वणी) यांनी तक्रार दिली की, ते मिर्झा वाशिंग सेंटर (गॅरेज) वणी या ठिकाणी त्यांची फोर व्हीलर गाडी दुरुस्तीसाठी आणली असता, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून तीन तोळ्याची एक, अशा दोन बांगड्या आणि चपला कंठी हार वजन दीड तोडे असा एकूण साडेसात तोडे सोन्याचा मुद्देमाल चोरी गेला होता, सदर गुन्ह्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होताच,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पो कॉ नंदकुमार, गणेश, गजानन, मुनेश्वर यांनी सदर गुन्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपीला पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याने त्याचे नाव शेख तनवीर शेख अजिज (वय 20) रा. रंगनाथ नगर, वणी असे सांगितले. त्यास गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यास पोलीस हिसका दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील मालमत्ता ज्या ठिकाणी लपवून ठेवली होती, ती हस्तगत करण्यात आली.यामध्ये तीन तोळ्याची एक अशा दोन बांगड्या, एक चपला कंठी हार वजन दीड तोडे,असे एकूण साडेसात तोडे वजनाचे अंदाजे किंमत 7 लाख रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून घेतला.
सदरची कारवाई ही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होताच अवघ्या दोन तासांमध्ये केलेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच कौतुक होत आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर याचे आदेशानुसार पोउपनि धीरज गुल्हाने,पोलीस कॉन्स्टेबल गणेश, नंदकुमार, मोनेश्वर, गजानन यांनी केली.
 
Previous Post Next Post