सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील स्व.कृष्णराव ठाकरे माध्यमिक विद्यालयाची मागील २४ वर्षापासून बोडाच्या परिक्षेच्या निकालची परंपरा कायम राखत्न असून यावर्षी १२ वी (कला) परिक्षेचा निकाल ८७.८० टक्के तर १० वी चा निकाल ९२.१२ टक्के लागल आहे.इयत्ता १२ वी मध्ये अखील बंडावार प्रथम तर इयत्ता 10 वी मध्ये आशिष विनोद चिल्कावार ७७.६०% मिळवून प्रथम आला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा व आई वडीलचा त्यांच्या घरी जाऊन पूष्पगुच्छ व पेठे देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या या यशाचे गावालील पालकवर्ग संस्थेचे अध्यक्ष मनिषभाऊ पाटील,व्यवस्थापक लक्ष्मनराव पवार,शाळा सुधार समीतीचे रोहन पाटील,मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचारी तसेच माजी विद्याध्यानी कौतूक केले.
स्व.कृष्णराव ठाकरे विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2025
Rating: