गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शेतीचा हंगाम तोंडावर आणि त्या शेतकऱ्याने कडू निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज गुरुवारी मारेगाव तालुक्यात दुपारी घडली.
प्रभाकर आत्माराम निखाडे (68) रा. चोपण असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक यांचे 5.5 एकर शेती आहे. त्यावर ते आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकलाचे. मात्र,सतत उत्पन्न घटत असल्यामुळे कर्जाचे डोंगर वाढले, या विवंचनेत त्याने आत्महत्या केली असे बोलल्या जात आहे. 
त्यांनी दोन दिवसापूर्वी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असं समजते. त्याच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. वृत्त लिहेपर्यंत पंचनाम्याची कारवाई व्हायची होती. 
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on May 22, 2025 Rating: 5
Powered by Blogger.