सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : उन्हाळा लागला की, मनुष्य प्राणी हा पाण्यासाठी वणवण भटकत असतो, ही मानवीय भटकंती कुठेतरी थांबावी म्हणून वनोजा ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी मागील वर्षी गावकऱ्यांना स्व. मानधनातून टँकरने तहान भागवली होती.
मागील 2024 मध्ये वनोजा येथील महिलांनी पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन मारेगाव यावर धडक "घागर मोर्चा" काढला होता. तरी पण प्रशासनाला जाग आली नाही. त्यानंतर जून-जुलै मध्ये उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी स्वताच्या मानधनातून गावकऱ्यांना टॅंकरने पाणी पाजले होते, हे विशेष...
एप्रिल मे महिना म्हटलं की उन्हाचा पारा वरचढ असतो. त्यामुळे पाण्याशिवाय जगणे कठीण असतं, अशावेळी पाण्याची गरज असते. हिच निड लक्षात घेऊन उपसरपंच भंडारी यांचा यावर्षी सुद्धा गावातील नागरिकांची निशुल्क पाणी पुरवठा करण्याचा मानस आहे.
प्रशासनाने टँकर लावावे मी माझ्या विहिरीवरून निशुल्क दररोज दोन टँकर पाणी भरून देईन मला त्याबद्दल कोणताही मोबदला नको आहे.~ प्रशांत भंडारीउपसरपंच ग्रामपंचायत, वनोजा,पं स मारेगाव
मला त्याबद्दल कोणताही मोबदला नको आहे-उपसरपंच प्रशांत भंडारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 14, 2025
Rating: