सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील वेगाव (जुनी वस्ती) येथे दि. 28 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली.
अरुण नानाजी टोंगे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गावाशेजारील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात म्हैस चरत होती. याचवेळी मेगर्जनेसह पाऊस सुरू झाला आणि अचानक वीज थेट चरत असलेल्या म्हशीवर पडली. ती जागीच मृत्यूमुखी पडली.
या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली आहे. शेतकरी टोंगे यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. शासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची घोषणा करावी, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
वीज कोसळून शेतकऱ्याची म्हैस दगावली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 28, 2025
Rating: