सह्याद्री चौफेर| ऑनलाईन
शहरासह ग्रामीण भागातील आदिवासी वर सतत अन्याय होत आहे आणि त्या आरोपीना अभय देण्याचं काम पोलीस प्रशासन करतात, असा आरोप आदिवासी बांधवाकडून आयोजित मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.
मुकुटबन पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरोपीना अभय मिळत असल्यामुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध आदिवासी समाजाच्या वतीने दि. 21 मे रोजी सकाळी 11 वा. शहरातील भीमालपेन मंदिरापासून मोर्चा ला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचला, तेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकले. आरोपीचा जामीन रद्द करून अटक करा, दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, नमूद बाबी एस आय टी कडे सोपविण्यात यावा, यासह इतर नमूद मुद्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले, यावेळी संबंधितांशी चर्चा करून निवेदनातून न्यायाची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, गीत घोष, अॅड. अरविंद सिडाम, विजय पिदूरकर, सुभाष आडे, रमेश मडावी, संतोष पेंदोर, सुधाकर चांदेकर, भारती पेंदोर, होमदेव कनाके, सुनील गेडाम, सीमा कुमरे, संतोष चांदेकर, सुमित गेडाम, लहानू सालूरकर, महेश आत्राम यासह वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील सर्व आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आदिवासीचा न्यायासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 22, 2025
Rating: