1 मे च्या घटनेचा संशयित पोलिसांच्या जाळ्यात

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील गॅस गोडाऊनचे मागे गांधी नगर परिसरातील तळ्या जवळ एका बेसावध तरुणीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. राजू तथा कटर (अं. वय 47, रा. खरबडा, वणी) असं संशयिताचे नाव आहे.

1 मे,महाराष्ट्र दिनी एका 18 वर्षीय युवती वर झालेल्या शारीरिक व अनैसर्गिक अत्याचारच्या घटनेने वणी हादरलं होतं. धक्कादायक म्हणजे भरदिवसा पीडित युवती विटा भट्टी कडे तुटलेल्या विटा गोळा करण्यासाठी जात असताना तिला चक्क मागून जोरात पकडून, लाथाबुक्याने मारहाण करून तीचे कपडे फाडले,त्यानंतर तिला काटेरी झुडूपात ओढत नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा अज्ञात गुन्हा नोंद झाला होता. 

संशयित हा घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याने पोलिसांना शंका आली आणि त्याचाच कसून शोध घेत होते. मुलीवर लैंगिक अत्याचार करतांना दाडी वाढवून असलेल्या या आरोपीने नंतर चेहऱ्यावरची दाडी काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांची आणखी संशयाची सुई त्याचेवर वळली. त्याचेवर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पोलिसांनी त्यालाच लक्ष केले. शेवटी सात दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला संशयित पोलिसांच्या हाती लागलाच. पोलिसांनी या संशयिताला अटक केली आहे. 

कटर नावाने ओळखला जाणारा तो मानकी शेत शिवारात दडी मारून होता. खाकींची चाहूल लागताच तो सैराट झाला. मात्र, पोलिसांच्या चमुने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात डिबी पथक प्रमुख एपीआय धिरज गुल्हाने व डीबी चमू व पोलिस चमुने पार पाडली.
1 मे च्या घटनेचा संशयित पोलिसांच्या जाळ्यात 1 मे च्या घटनेचा संशयित पोलिसांच्या जाळ्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on May 08, 2025 Rating: 5
Powered by Blogger.