महापुरुषांच्या विचाराची समाजाला गरज- ह.भ.प.जयश्री गावतुरे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांनी शोषित, पिडीत, वंचित, समाजाला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, यासह समाजातील वाईट चालीरीती विरोधात बंड करुन समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र कष्ट केले, अशा या महामानवाच्या कल्याणकारी विचाराची समाजाला गरज आहे.असे प्रतिपादन सुप्रसिध्द प्रबोधनकार ह.भ.प. जयश्री गावतुरे यांनी केले.त्या मार्डी येथे आयोजीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाच्या विचार मंचावर प्रमुख वक्त्यां म्हणून बोलत होत्या.
या जयंती सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी मार्डी येथील पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामकृष्ण चौधरी, मराठा सेवा संघाचे नेते सुधारक इंगोले, ग्रामपंचायत सदस्य मंगला टिपले,मनिषा चौधरी, सुरज पंडीले,गणेश कनाके मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. माळी समाज सुधारक मंडळ मार्डीचे वतीने मार्डी येथे पहील्यांदाच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती सोहळ्यात मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

सकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,तोरण पताका,लावुन परिसर स्वच्छ करण्यात आला.पाच वाजता रैली काढण्यात आली. ही रैली गावाच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत परत कार्यक्रम स्थळी पोहचली त्यानंतर विचार मंचावर अनेक मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवण कार्यावर प्रकाश टाकला. रात्री 9 वाजता उत्कृष्ट खंजेरी वादक प्रबोधनकार ह.भ.प. जयश्री गावतुरे यांनी प्रबोधनकारी खंजेरी वाजवुन त्यांच्या सुमधुर वणीने उपस्थितांना प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधारक इंगोले यांनी सुत्रसंचालन विजय कांबळे यांनी तर आभार कवडु वाढई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माळी समाज सुधारक मंडळ मार्डीचे उध्दव चौधरी, कवडु वाढई, किसन मोहुर्ले, अनिल गुरनुले, मंदा गाऊत्रे, संजिवनी गुरनुले, अरुणा चौधरी, माधुरी गुरनुले, कल्पना मांदाडे, शोभा वाढई, यासह माळी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
महापुरुषांच्या विचाराची समाजाला गरज- ह.भ.प.जयश्री गावतुरे महापुरुषांच्या विचाराची समाजाला गरज- ह.भ.प.जयश्री गावतुरे Reviewed by सह्याद्री चौफेर on April 15, 2025 Rating: 5
Powered by Blogger.