सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ चालू हंगामात मिळावा, यासाठी वैभव कवरासे माजी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून मागणी केली.
वणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेले होते. तसेच पावसाळ्यात नदी व नाल्याजवळील पुरामुळे अनेक दिवस पाणी साचल्यामुळे शेतपिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे वणी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता पिकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या व त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करूण सर्वेक्षण केले. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. असा आरोप त्यांनी केला असून सोयाबिनचे पिक काढून जवळपास ३ महिने झालेले आहे. कपासीचे पिक सुध्दा संपलेले आहे. सदर पिकविमा योजनेचा लाभ खरीप हंगाम संपल्यानंतर एक महिन्यानंतर मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु कोणत्याही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ चालु वर्षात मिळालेला नाही आहे.
त्यामुळे संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत तक्रार निवारण सभेचे आयोजन लवकरात लवकर करावे जेनेकरूण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ पिकविमा कंपनीमार्फत मिळवुन देता येईल. अशी आग्रही मागणी वैभव कवरासे यांनी तालुका प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी वणी, व तहसीलदार यांना सुद्धा निवेदनाची प्रत सुपूर्द केली.
प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तत्काळ द्या - वैभव कवरासे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 05, 2025
Rating: