रेती अभावी रखडले घरकुलाचे काम; लाभार्थी सापडले संकटात!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : घरकुल धारकांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश सध्या तरी हवेत विरला असून रेती अभावी घरकुल बांधकाम रखडले असल्याने लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

एकीकडे केंद्र शासनाच्या वतीने गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकूल योजना राबवली जात आहे. पंतप्रधान घरकूल आवास योजनेअंतर्गत २०२४ ते २०२५ या वर्षामध्ये गरजू लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले. मंजूर घरकुलांसाठी शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही रेती मिळाली नसल्याने घरकुलांचे काम अर्धवट पडले आहे.घरकुलाचे बांधकाम आपल्याला पूर्ण करणे आहे. त्यामुळे लाभार्थी आपले राहायचे कसेबसे मोडकळीस आलेले घर पाडून आपल्या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहेत. रेतीअभावी त्यांचे घरकुलाचे काम रखडलेले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी
गरजवंतांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकूल आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे कामे मंजूर करण्यात आले आहेत. परंतु शासनाकडून मिळत असलेली ५ ब्रास रेती लाभार्थ्यांना मिळत नसल्यामुळे घरकुलाचे कामे रखडले आहे. त्यामुळे गवंडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे

चोरीच्या रेतीला अधिकचे पैसे मोजावे लागतात
प्रशासनाने घरकूल लाभार्थ्यांची गंभीर बाब लक्षात घेऊन तत्काळ रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सध्या रेतीचा तुटवडा असल्याने चोरीच्या रेतीला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. एकूणच रेती खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नागरिकांची मोठी लूट होत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.
रेती अभावी रखडले घरकुलाचे काम; लाभार्थी सापडले संकटात! रेती अभावी रखडले घरकुलाचे काम; लाभार्थी सापडले संकटात! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 05, 2025 Rating: 5
Powered by Blogger.